मनसोक्त जगावं. ( यारा जिंदगी जी ले जरा... )

एकदा एक वृद्ध महिला आपल्या घरातील एक कुंडीत लावलेल्या रोपा जवळ उभी होती. तिच्या हातात त्या कुंडीतील रोपाला पाणी देणारे भांडे आहे. लांबून पहिले तर ती वृद्ध महिला त्या कुंडीतील रोपाला पाणी देण्याच्या भांड्याने पाणी देत आहे असे दिसते आहे. हे सर्व एक लहान मुलगी लांबून पाहत आहे व ती त्या वृद्ध महिलेला विचारते कि ....

"आजी तुम्ही हे काय करत आहात?"

"मी या कुंडीतील रोपाला पाणी देत आहे बेटा." - वृद्ध महिला म्हणाली

पण ती लहान मुलगी थोडे अचंबित होऊन विचारते - "आजी पण हे कुंडी व त्यातील रोप नकली आहे."

"माहित आहे ग बेटा … अग पण, ह्या पाणी देणाऱ्या भांड्यामध्ये पाणी तरी कुठे आहे."


वरील या प्रसंगात ती वृद्ध महिला क्रियाशील (Active) जरूर आहे. ती नक्की काहीना काहीतरी करत आहे. ती त्या कुंडीतील रोपाला पाणी देण्याचे काम करत आहे, पण त्यात उत्पादनशीलता (Productive) नाही आहे. कारण तिच्या कामामुळे त्या रोपाला काहीच फायदा होत नाही आहे.

कदाचित तुमच्या माझ्या बाबतीत यापेक्षा काय वेगळे घडते आहे? आपले दिवसभरातील काम मग ते खाजगी असो, कंपनीतील असो अथवा आपल्या व्यवसायातील असो आपल्याला काय असा फायदा मिळवून देत आहे? आपण नक्की उत्पादनशील (Productive) आहोत की फक्त क्रियाशील (Active) आहोत? आपण आपल्या स्वप्नांवर काम करत आहोत की आपल्या गरजांसाठी काम करत आहोत (थोडक्यात काही तरी काम करणे हि आपली गरज बनली आहे का?) …. सोचने वाली बात है.

काल माझ्या मनातही असाच खूपसा गोंधळ चालू होता. एका मित्राला फोन केला, म्हटले भेटायचे आहे. तो असा मित्र आहे ज्याचा मी मनापासून आदर करतो. त्याला समोर बसवले व माझ्या मनातील चलबिचल त्याला सांगितली. त्याने मला चर्चेअंती प्रेरित केले, म्हणाला "उल्हास तू करू शकतोस, तुझ्यात ती क्षमता आहे. चल उठ लाग कामाला."

शेवटी तो माझ्या बद्दल एक वाक्य म्हणाला ते खूप विशेष होते. "उल्हास, तू माझ्या मते त्या शापित कर्णा सारखा आहेस. राजा बनण्याची त्या कर्णाची सिद्धता होती. पण …. तसेच काहीसे तुझे आहे … सबकुछ हे तेरे अंदर भरा हुवा पर …पण … परंतु …त्याच्या पर …पण … परंतु … या मधे तो मला खूप काही सांगून गेला. 











खरच वरील गोष्ट व माझ्या मित्राने दिलेली माझ्या बद्दलची ती कमेंट "शापित कर्ण" यात किती साम्य आहे. खरच किती योग्य ते बोलला माझा तो मित्र. विचार करताना लक्षात आले की असे अनेक "शापित कर्ण" मी देखील माझ्या आजू बाजूला पाहतो आहे. 

'भाग मिल्खा भाग' हा चित्रपतातील एक डायलॉग त्यावेळी, त्या प्रसंगी मला आठवला. त्या प्रसंगात एक व्यक्ती मिल्खा सिंघला सांगतो की …. "ये आपके लाइफ आखरी दौड हो सकती है " त्या वेळी मिल्खा सिंघ उत्तर देतो की " दौडुंगा भी वैसे ही" असेच काहीशा उत्तराने त्या वेळी माझ्या त्या मित्राला मला प्रॉमिस करावेसे वाटले. केले ना, पण मनातल्या मनात…. 








तो एक मस्त डॉयलॉग आहे ..... "मेरी हालत गुप्ता अंकल की जैसी गयी है. उन्होने कभी सिगरेट नही पी, शराब नही पी, फिर भी उनको कॅन्सर हो गया. इससे अच्छा तो थोडा पी लेते." Queen चित्रपटातला हा संवांद 'कंगना राणावत' बोलते आणि तो डायलॉग डायरेक्ट मनाला भिडतो. आपलही जगणे असेच आहे, ते असतंच हे अचानक जाणवत, नाही ते धडकत. कोणी तरी आपण झोपले असताना पाण्याची भरलेली बादली आणून पाणी जोरात तोंडावर मारावे व अचानक खडबडून जागे झाल्यासारखे व्हावे…. असे काहीसे तो डायलॉग ऐकून होते. 









हे जाणवण, समजण, ते उमजण फार महत्वाचे आहे. तोडून द्यावेत ते सर्व बंध, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल …. फेकून द्यावे ते विचार, आणि मनसोक्त जगावं…. यारा जिंदगी जी ले जरा …. 


- उल्हास कोटकर

9821033736




1 comment:

zazellamartina said...

Harrah's Las Vegas - Mapyro
Harrah's is a casino and hotel located 진주 출장샵 in the heart 영천 출장샵 of Las Vegas. 대전광역 출장샵 The property is connected to a shopping 서울특별 출장샵 center and through a shopping  Rating: 2.6 · ‎10 reviews · ‎Price range: $$$How is Harrah's Las Vegas rated?What 평택 출장마사지 days are Harrah's Las Vegas open?