उल्हास कोटकर { संपर्क, माहिती व परिचय. }

Author | Public speaking Expert | Coaching Political Leaders | Passionate Teacher | Motivational Speaker | Management & Business Growth Consultant

उल्हास कोटकर हे लेखक, उत्तम वक्ते घडवणारे प्रभावी प्रशिक्षक, पॅशनेट टीचर, पॉलिटिकल कोच व प्रोफेशनल मॅनेजमेंट मार्गदर्शक आहेत.

‘उल्हास कोटकर अकॅडमी' चे ते संचालक आहेत. नेतृत्वविकास व भाषणकला प्रशिक्षण क्षेत्रात त्यांचा 23 वर्षाचा गाढा अनुभव आहे व इतक्या वर्षात त्यांनी 1 लाखांहून अप्रत्यक्ष व 15 हजारांहून अधिक लोकांना वैयक्तिक प्रशिक्षित केले आहे. संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिचा आत्मविश्वास व्दिगुणित करणे, त्यांना त्यांच्या खऱ्या क्षमतांची जाणिव करुन देणे व त्यांची कामगिरी उच्च पातळीवर नेणे हाच त्यांचा ध्यास बनलेला आहे. 

उत्तम वक्ता घडवण्यासाठी प्रशिक्षण, ट्रेन द ट्रेनर, राजकारणात नेता होण्यासाठी प्रशिक्षण, बिझनेस कम्युनिकेशन, प्रोफेशनल मॅनेजमेंट व उद्योजकता विकास प्रशिक्षण या आणि अशा अनेक विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे ते आयोजन करतात. 

उल्हास कोटकर हे मोटिव्हेशनल स्पिकर देखील आहेत व ‘निवडक मोटेव्हेशन’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध प्रेरणादायी व्याख्यानाद्वारे कायापालट घडवून आणणारे, विलक्षण बदल घडवून आणणारे प्रभावी मार्गदर्शन देखील ते करतात. अनेक कॉलेजेस मधून, सेमिनार्स मधून, व्याख्यानमालामधून, उद्योजकांच्या क्लबमधून त्यांना विशेष मार्गदर्शक वक्ते म्हणून आमंत्रीत देखील केले जाते.

उल्हास कोटकर हे प्रेरणादायी- INSPIRATIONAL & BUSINESS Talks इव्हेंट्स आयोजक म्हणजेच, करिअर मार्गदर्शन, प्रेरणादायी भाषणे व मुलाखतीचे कार्यक्रम आयोजक देखील आहेत. स्वप्न बघा स्वप्न जगा, स्वप्नांना पंख प्रेरणेचे, स्वप्नांना देऊ नवी दिशा हि स्वप्न सिरीज, व्हा चेंजमेकर्स, ई-ज्ञानयात्रा, नवीन वक्त्यांना घडताना पहा (ज्ञानयात्रा), प्रोफेशनल वक्ता कट्टा, ‘बिझनेस गप्पा’ या व अशा अनेक विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सुमारे 10 लाखांहून अधिक लोकांपर्यंत त्यांनी अनेक प्रेरक उदाहरणे, प्रेरणादायी कहाण्या, प्रतिथयश व्यक्तीमत्वांचे प्रेरणादायी विचार व यशोगाथा पोहचवल्या आहेत. 

'मी उद्योजक होणारच!' या संस्थांच्या दर्जेदार प्रेरणादायी कार्यक्रम आयोजनात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे. माजी पदवीधर आमदार व माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या 10 हुन अधिक अनेक करिअर मार्गदर्शनपर कार्यक्रमांची मुख्य धुरा उल्हास कोटकर यांनीच सांभाळली आहे.  

जग बदलु पाहणारी नवे रोल मॉडेल्स, नवे विचार लोकांसमोर यायला हवीत या हेतूने ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गेले 11 वर्ष कार्यरत आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक दर्जेदार प्रेरणादायी कार्यक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आयोजित केले आहेत. 

उल्हास कोटकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक नामवंत पाहुण्यांची व वक्त्यांची उपस्थिती लाभली आहे. काही वक्त्यांचा उल्लेख करायचा झाला तर सिंधुताई सकपाळ, डॉ. आनंद नाडकर्णी, पोपटराव पवार, प्रा. प्रवीण दवणे, डॉ. उदय निरगुडकर, गोपी कुकडे, मधुकर तळवलकर, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेन्द्र दाभोळकर, महेश म्हात्रे, डॉ. अच्युत गोडबोले, अनुराधा प्रभुदेसाई, विठ्ठल कामत, आदेश बांदेकर, डॉ. विजया वाड, प्रदीप लोखंडे, डॉ. तात्याराव लहाने, उद्धवजी ठाकरे, कौशल इनामदार, अविनाश धर्मधिकारी  .... वै अशी अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. 

उल्हास कोटकर यांचे इव्हेन्ट म्यानेजमेंट, अडव्हर्टाझिंग, मीडिया म्यानेजमेंट यात विशेष शिक्षण झालेले आहे. 

नेतृत्व, व्यक्तीमत्व व व्यावसायिक विकास प्रशिक्षक होण्याचे प्रशिक्षण त्यांनी देश विदेशातील नामांकित प्रशिक्षक मॅक अत्राम, ब्लेयर सिंगर, थॉडस लॉरेन्स, करण हसीजा, राजीव तलरेजा, समीर सुर्वे, कुंदन गुरव यासारख्या नामांकित प्रशिक्षकांकडून घेतले आहे, समीर सुर्वे यांच्यासोबत उल्हास कोटकर यांनी 1998 ते 2008 पर्यंत 'पथिक' या संस्थेत प्रमुख आधारस्तंभ म्हणून काम देखील केले आहे.  

उल्हास कोटकर हे फेसबुक व यु ट्यूब वर प्रभावी सक्रिय असून, यु ट्यूब वरील त्यांच्या व्हिडियोजला लाखांहून अधिक व्ह्यूज त्यांना दर महिन्याला मिळतात. उल्हास कोटकर हे झपाटल्यासारखे वाचन करणारे वाचक आहेत, प्रेरक व दिशादर्शक ठरेल अशी उपयुक्त माहिती देणारे ब्लॉगही (Blog) ते चालवतात. 

कॉल मोबाईल / WhatsApp / टेलिग्राम - 9821033736

ईमेल -  kotkarulhas@gmail.com

इंस्टाग्राम Follow करा. - https://www.instagram.com/kotkar_ulhas/ 

फेसबुक पेज Like व Follow करा. - https://www.facebook.com/ulhaskotkar/

युट्युब चॅनेल Subscribe करा. - https://www.youtube.com/user/kotkarulhas

ट्विटर - https://twitter.com/ulhaaskotkar

लिंक्डइन - https://www.linkedin.com/in/ulhaskotkar/

वेबसाईट - http://ulhaskotkar.com/