( 'Don't Push, Just Pull' ) आपल्या प्रगतीचा, समृद्धीचा व आनंदाचा मार्ग उघडण्यासाठी.

एकदा एक व्यक्ती डॉक्टरकडे गेली व म्हणाली, " डॉक्टर माझा एक अजबच प्रॉब्लेम होतो आहे. रोज रात्री झोपण्याच्या वेळी झोप येते मला, पण काही वेळा नंतर मी झोपेतच उठून चालू लागतो व शोधत शोधत एका दरवाज्या जवळ येतो. मी तो दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करतो पण तो दरवाजा उघडतच नाही. त्यानंतर मला खूप घामाघूम व त्रास व्हायला लागतो. त्यानंतर का कोण जाणे झोपच लागत नाही. सध्या रोजच हे घडत आहे. कृपया मला मदत करा, मला काहीच सुचत नाही आहे, की मी काय करू?"


डॉक्टर शांतपणे त्या व्यक्तीचे ते सर्व बोलणे ऐकून घेतात व त्याला एक औषध देत दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगतात. 


दुसऱ्या दिवशी पुन्हा ती व्यक्ती येउन पुन्हा तोच त्रास काल रात्री झाला ते सांगतात. थोडक्यात औषधाची मात्रा काही सफल होत नाही. ती व्यक्ती डॉक्टरांना सांगते की "अहो तो दरवाजा ढकलण्याचा मी खूप प्रयत्न करतो आहे, पण तो दरवाजाच उघडतच नाही."


डॉक्टर पुन्हा शांतपणे ऐकून घेतात व काही प्रश्न विचारतात. " मला सांगा तुम्ही तो दरवाजा ढकलण्याचा का प्रयत्न करत आहात?"


ती व्यक्ती म्हणते "डॉक्टर त्या दरवाज्याच्या मागे माझ्या प्रगतीचा, माझ्या समृद्धीचा व माझ्या आनंदाचा मार्ग आहे. मी खूप ढकलून तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो दरवाजा उघडतच नाही. त्यामुळे मला माझा प्रगतीचा मार्ग पाहता येत नाही आहे. त्यानंतर मला खूप घामाघूम व त्रास व्हायला लागतो. त्यानंतर का कोण जाणे झोपच लागत नाही. 


डॉक्टर हे सर्व ऐकून मनातल्या मनात हसतात व त्या व्यक्तीला पुन्हा एक प्रश्न विचारतात, " मला सांगा तुम्ही आतपर्यंत अनेक वेळा झोपेत चालत त्या दरवाजा पर्यंत गेला आहात?' त्यामुळे तो दरवाजा तुम्हाला सतत आठवत असेल?"


ती व्यक्ती "हो" 


डॉक्टर "मला आठवून सांगू शकाल की तो दरवाजा कसा दिसतो आहे? त्यावर रंग कसा आहे? त्यावर काय लिहिले आहे? डोळे बंद करून नीट पहा, मेंदूला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करा? काय काय आठवते आहे ते मला सांगा"


ती व्यक्ती डोळे बंद करून डॉक्टर ने सांगितल्या प्रमाणे सर्व आठवू लागते. तो दरवाजा डोळ्यासमोर आणून नीट पाहू लागते. आणि थोड्या वेळाने ती व्यक्ती मोठ्याने ओरडतच उसळते. "डॉक्टर डॉक्टर मला समजले, मला ते दिसले, मला उत्तर मिळाले." 


डॉक्टर विचारतात " काय समजले, काय दिसले ते मला सांगा. तुम्हाला काय उत्तर कळले ते ही सांगा."


ती व्यक्ती " डॉक्टर मी खूप जोर देऊन तो दरवाजा डोळ्यासमोर आणला. अंधुक अंधुक दिसत होते प्रथम, पण मी जोर लाऊन पहिले तर मला त्या दरवाजावर एक पाटी दिसली, त्यावर काहीतरी लिहिले होते. त्यावर धूळ होती ती मी साफ केली, आणि पहिले की त्यावर लिहिले आहे 'दरवाजा उघडण्यासाठी तुमच्याकडे तो ओढून घ्या - ( Don't Push, Just Pull )


"डॉक्टर मी इतके दिवस तो दरवाजा निट पहिलाच नव्हता. त्यावरील पाटी व त्यावर काय लिहिले आहे याकडे लक्षच दिले नव्हते. मी रोज तो दरवाजा ढकलून उघडण्याचा प्रयत्न करत होतो. आज मला उत्तर मिळाले की तो दरवाजा उघडण्यासाठी माझ्याकडे तो ओढून घेतला तर तो उघडेल"


"डॉक्टर तुमचा मी खूप आभारी आहे. माझी ही समस्या सोडविण्यास तुम्ही मला मदत केली. मला माझ्या प्रगतीचा, समृद्धीचा व आनंदाचा मार्ग जो त्या दरवाजा मागे होता, तो दरवाजा उघडायचा कसा हे तुम्ही शोधण्यास मदत केल्याबद्दल. आज रात्री पुन्हा तो प्रसंग घडेल तेव्हा मी तो दरवाजा न ढकलता स्वतःकडे ओढून घेऊन उघडेन." 


मित्रांनो या गोष्टीतून एकच सुचवायचे आहे तुम्हाला, जे मला स्वतःला उमजले आहे. 'प्रश्न, प्रॉब्लेमस व आपल्या समोरील आव्हाने टाळून, दूर लोटून व ढकलून आपण कुठेच पोहचणार नाही. उलट त्या सर्व गोष्टी स्वतःजवळ ओढून घेऊनच आपण आपल्या प्रगतीचा, समृद्धीचा व आनंदाचा मार्ग उघडू शकतो. So Don't Push, Just Pull


- उल्हास कोटकर 9821033736




No comments: