उत्कृष्ट सार्वजनिक भाषणासाठी आत्मविश्वास खरोखरच महत्त्वाचा आहे का?

आत्मविश्वासाने दिसणे आणि आत्मविश्वास वाटणे या एकाच गोष्टी नाहीत. आत्मविश्वास ही एक प्रक्रिया आहे, जागा नाही. कोणत्याही क्षेत्रातील आपले कौशल्य जसजसे वाढत जाते, तसतसे आपण अजूनही कुठे सुधारणा करू शकतो हे पाहण्याची आपली क्षमता वाढते. वेगळ्या पद्धतीने सांगायचे तर: जेव्हा आपण सार्वजनिक बोलण्यासारखे नवीन कौशल्य आत्मसात करू लागतो, तेव्हा आपण मिळवलेले कोणतेही फायदे मोठे वाटतात. आपले डोळे शक्यतांकडे उघडले आहेत आणि नवीन मार्ग सुरू करणे रोमांचक वाटू शकते.

जेव्हा मला अधिक आत्मविश्वास असेल तेव्हा मी अधिक चांगले सार्वजनिक बोलेन, याऐवजी स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करा कि, जेव्हा मी अधिक कुशल आणि अनुभवी सार्वजनिक वक्ता असेन तेव्हा मला अधिक आत्मविश्वास वाटेल आणि त्यासाठी काम करणे योग्य आहे. 






स्वप्न लिहून ठेवा, लिहिली नसतील तर लिहायला सुरवात करा.

तुम्हा आम्हा सर्वांमध्ये दडलेला एक वृक्ष आहे. त्याला आकाशचं निमंत्रण, पावसाची साथ आणि वाऱ्याची साद मिळली ना तर त्याचे वृक्षात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही. चला मोठे होऊया मनाने, चला मोठे होऊया विचाराने, चला मोठे होऊया कर्तुत्वाने …. पण असे मोठे होताना जीवन नुसतेच भरायचे म्हणून भरू नका. म्हणजे काय, हे मी स्वतः समजून घेताना, एक गोष्ट मला इथे यावेळी आठवली. 


एकदा एक माणूस तहानेने व्याकूळ होवून मेला. पाण्याचा एकही थेंब पिऊ न शकल्याने अखेर त्याचा अंत झाला. तो असं काय करत होता? तर तो आपल्या घरातच पाणी भरत होता. मोठ मोठी भांडी भरून झाली. कळशी, टोप, पातेली, वाट्या, पेले, चमचे सरते शेवटी चाळण आणि गाळणीसुद्धा भरण्याचा प्रयत्न झाला. त्या एवढ्या धावपळीत त्याला स्वतःला तहान लागली पण पाण्याच्या हव्यासापोटी तो भरलेल्या पाण्यापैकी पाणी प्यायला तयार नव्हता आणि त्याची अखेर झाली. असेच नुसते जीवन भरण्याचा हव्यास नको.


उतूंग शिखरावर जायचं ना … तर मग स्वप्न बघा. उद्याचं सत्य हे आजचं स्वप्नच असतं हे लक्षात घ्या. स्वप्न तुमच्या मनातले, स्वप्न तुमच्या विचारातले …. ते पुन्हा पुन्हा पहायला शिका. पांघरूण घेऊन झोपला असाल तर ते दूर करा. खिडकी उघडा. 


मी कसा दिसेन ही काळजी नको तर मी कसा असेन याची काळजी घ्या. देवाने माणसं ही झेरॉक्स प्रमाणे एकसारखी जन्माला घातलेली नाहीत. पं. रवी शंकर, डॉ.अब्दूल कालाम हे जसे एकमेवाद्वीतीय तसेच आपल्या सारखे आपणच. प्रत्येक माणूस हा युनिक आहे आणि म्हणूनच एकमेव आहे, तीच खरी ताकद आहे. 


दुसऱ्यांपासून प्रेरणा घ्या मात्र भरारी घेणारे पंख तुमचेच असू द्या. 


जो पोहायला शिकवतो त्याने हात पाय मारून तुम्हाला मला पोहता येणार नसते. 


पोहायला शिकवतो त्यालाच मिठी मारू नका दोघेही बुडण्याची शक्यता असते. 


स्वप्न पहिलीत तर काहीही शक्य आहे. आता हेच बघा ना, एका पथ्थराला स्वप्न पडत की आपण सागर व्हावं. हो हो हो … एका पथ्थराला सुद्धा स्वप्न पडत…. अहो पथ्थराला पाझर फुटला की, त्याचा ओहळ होतो, पुढे तो नदीला मिळतो, नदी सागराला मिळाली की तेव्हाच तो पथ्थर सागर होतो. 


एक पथ्थर पर्वतावरून असा उतरतो मग तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं. नदी सारखे नेहमी वाहते रहा… अडथळे येऊ देत, काटेकुटे येऊ देत …. तरी, वाट काढून वाहते रहा. एका जागेवर थांबनाऱ्याला अडथळा कसा येणार? 


सरपटणाऱ्या माणसांना कोसळण्याची भिती नसते. 

तेव्हा आपण का कोसळत नाही याचा विचार करा.


आपल्या आजूबाजूला पुर्वीसारखे रोल मॉडेल्स दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा तुम्ही आम्ही होऊया ना रोल मॉडेल्स असा विचार करा. हा विचार जर हरवलाय तर तो शोधूया. जगण्याची कला आत्मसात करूया. आणे वाला पल, जाने वाला है … या येणाऱ्या वेळेचे महत्व जो जाणतो, तोच त्याच्या प्रत्येक क्षणाची दिवाळी करतो. आजच्या छोट्या छोट्या यशामध्ये, छोट्या छोट्या दुखामध्ये नुसतेच गुंतून राहू नका, उद्याच्या स्वप्नांची काळजी घ्या. 


स्वप्न लिहून ठेवा, लिहिली नसतील तर लिहायला सुरवात करा … त्यावर बोलायला सुरवात करा. अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करत आहेत... तुम्ही आम्ही पण त्यातले होऊया.


- उल्हास कोटकर

9821033736




छोटी छोटी कारणे आपल्या स्वप्नांना अपूरे ठेवतात.

एकदा एक वक्ता आपल्या भाषणात लोकांना विचारात होता "किती लोकांना आतापर्यंत हत्तीने चावले आहे?" कोणीही हात वर केला नाही. त्यांनी पुन्हा एकदा विचारले "किती लोकांना मच्छर ने चावले आहे?" यावेळी मात्र सर्वांनी हात वर केले.


वक्ता म्हणाला " पहा मागील काही वर्षात मच्छर चावल्यामुळे लाखो लोक आजारी पडल्याचे ऐकले आहे, पण हत्तीने चावल्याचे व त्यामुळे कोणी आजारी पडल्याचे ऐकले नाही." असेच आपल्या आयुष्यात घडताना आपण पाहतो. कोणत्याही मोठ्या कारणाने आपली स्वप्ने आपण पूर्ण करू शकलो नाही अशा ऐकण्यात काही थोडक्या गोष्टी आहेत. पण छोट्या छोट्या कारणांनी आपली स्वप्ने अपूरे राहिल्याची अनेक गोष्टी आहेत.


कोणती आहेत ही छोटी छोटी कारणे.


नकारात्मक विचार, टाळाटाळ, आळशीपणा, कंटाळा …. अशा अनेक गोष्टी.


यासारखीच छोटी छोटी कारणे आपल्या स्वप्नांना अपूरे ठेवतात. यावर उपाय एकच, एक मोठे कारण शोधा. त्यालाच आपल्या आयुष्याचे ध्येय बनवा. मी सकाळी लवकर उठतो ते कशासाठी, त्या एका मोठ्या कारणासाठी-स्वप्नासाठी हा मंत्र तयार करा. 


पहा हेच मोठे कारण आपल्याला छोट्या छोट्या कारणांनी येणाऱ्या अडथळे या पासून कसे वाचवते.


- उल्हास कोटकर  9821033736







'दररोज थोडसे, सुरु कर, बस्स!' ( हा मंत्र वापरा आपल्या आयुष्यात संधी निर्माण करा. )

 काही वर्षांपूर्वी 'भाग मिल्खा भाग' हा चित्रपट पहिला आणि खूप भारावून गेलो होतो. मिल्खा सिंघ यांचा संघर्ष, त्यांचे समर्पण त्यांची कठोर मेहनत व त्यांचा 'सामान्य माणूस ते असामान्य व्यक्तिमत्व' हा सर्व प्रवास अविश्वसनीय, अचंबीत करणारा. चित्रपट पाहताना अनेकदा श्वास रोखले गेले, कारण काय तर मनात सुरु असलेली खलबते "यार इतकी मेहनत घेणे मला जमेल का?, कठीण आहे"


खर सांगू तर हा चित्रपट पाहून मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. चित्रपट अप्रतिम, अवर्णनीय…त्याबद्दल काहीच वाद नाही. पण चित्रपटातून प्रेरणा घ्यायची म्हटले तर "बापरे इतकी मेहनत, इतके समर्पण मला जमेल का? हाच विचार डोक्यात.


खरच अशी माणसे असतात? कसे इतके ते जिद्दीने पेटून उठून आपले ध्येय साध्य करतात?


चित्रपटातील काही प्रसंग म्हणजे, मिल्खा सिंघ आर्मी मधे असताना जेव्हा एका सराव स्पर्धेत धावतात, ते एका दुधासाठी. नंतर पुढे एका स्पर्धेत धावतात, ते इंडिया हे नाव लिहिलेला कोट मिळविण्यासाठी. लहानपणापासूनच जीवन जगण्यासाठी त्यांना कमालीचा संघर्ष करावा लागला. आम्हाला लहानपणापासून सर्व काही सुरळीत मिळाले म्हणून कदाचित, जे नाही ते मिळवण्याची पराकोटीची जिद्दच कधी निर्माण झाली नाही.


पुढे जाऊन स्वप्ने तरी काय विशेष असतात हो … चांगले करियर करावे…. चांगले पैसे कमवावे … लग्न करावे … घर घ्यावे … अशीच काहीशी कॉमन. या सर्व प्रवासात असे नाही की आपण कधी संघर्ष करीत नाही, मेहनत घेत नाही …. कमी जास्त प्रमाणात ते थोडेफार असतेच.


या जडणघडणीत अनेक प्रेरणादायी कथा आपण ऐकतो, पाहतो …. त्याने असे केले … तिने असे केले. आज सचिन बघा कुठे, अमिताभ बच्चन पहा कुठे वेगरे वेगरे. बरे हे असामान्य लोक जोपर्यंत दूरचे असतात तोपर्यंत सर्व ठीक असते. पण आपल्यातीलच एक, आपल्या आजूबाजूला असणारा, आपल्याच रोजच्या ओळखीतला, कोणी 'सामान्य ते असामान्य' असा प्रवास करतो तेव्हा खूप त्रास होतो. थ्री इडीयट मधील तो डायलॉग आहे ना "दोस्त जब फेल हो तो बुरा लगता है, पर जब वो फर्स्ट आये तो बहुत बुरा लागता है".


खरंतर त्यांच्या होणाऱ्या प्रगतीचा त्रास नसतो, तर तो त्रास तुला मला ही संधी होती - आहे व तू मी काही केले नाही हे मनाला बोचायला लागते याचा असतो. दुसऱ्याची रेष छोटी करण्यापेक्षा तुझी रेष तूच स्वतः मोठी कर ना, हा विचार मनाला यावेळी प्रेरणा देतो.


आयुष्य म्हटले की स्वप्न, ध्येय, प्रॉब्लेम्स, संघर्ष हे आलेच. यात सातत्याने प्रेरणा ही लागणारच … मग काही पुस्तके, तर कधी प्रेरणादायी व्यक्तिमत्व यांना भेटणे, भाग मिल्खा भाग - लगान यासारखे चित्रपट पाहणे हे येतेच, असे म्हणू आपल्याकडून हे होतेच. आज आपल्या आजूबाजूला असे अनेक कोर्सेस देखील आहेत जे आपल्याला मोटीवेट करतात, आपल्याला प्रेरणा व दिशा देतात.


बर या प्रकारचे कोर्सेस आपल्याला शिक्षण देतात म्हणजे काय तर आपल्याला एक दृष्टीकोन देतात, बाकी करायचे असते ते आपल्यालाच. मग आता वर पाहिलेला चित्रपट, त्यातील लर्निंग लेसन्स, त्यातून मिळालेली प्रेरणा व आपल्या जीवनातील रोजचे छोटे मोठे संघर्ष याची सांगड कशी घालायची? कारण आपल्यालाही मोठे व्हायचे आहे, काहीतरी करून दाखवायचे आहे. विचार करता करता मला काहीसे आठवले, अचानक एक मंत्र आठवला. तो म्हणजे "दररोज थोडसे"


नाव एवढेसे पण त्यात मला खूप मोठा अर्थ सापडला "दररोज थोडसे"

काय आहे तो अर्थ हे जाणण्यासाठी पुढे वाचा.


एकदा एका कार्यक्रमात तळवलकर जिमन्याशियमचे सर्वेसर्वा ८० वर्षाचे फीट आणि फाईन ‘मधुकर तळवलकर सर’ बोलत होते. अचानक ते बोलता बोलता माझ्याकडे बोट करून सर्व प्रेक्षकांसमोर म्हणाले "बघा हा मी काय काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. आता हा आपला उल्हास आहे ना उल्हास. त्याने फक्त दररोज एवढेसे! करायचे की रोज दहा दंड व पंधरा उठाबश्या मारायच्या, असे रोज फक्त १५ मिनिटे, असे वर्षभर ३६५ दिवस करायचे. आता ३६५ दिवस गुणिले रोजचे दहा दंड व पंधरा उठाबश्या, करा बघू गणित. मला सांगा हे असे रोज "दररोज थोडसे" केल्यावर आपला उल्हास कसा दिसेल. दिसेल की नाही एकदम फीट आणि फाईन.


तळवलकर सरांचा तो माझ्यासाठीचा संदेश यावर मी रोज काम करतो आहे व आठवड्याला सरांना मोबाईल एस एम एस ने अपडेटही करतो आहे. सरांचा त्यानंतर कधी कधी फोन येतो व असेच करत रहा हा उल्हास "दररोज थोडसे" हा सल्लाही येतो. मला आता त्यांच्या त्या दोन मिनिटांच्या फोनची इतकी सवय झाली आहे की, मी आता जे रोज "दररोज थोडसे" करतो ते त्यांच्या त्या दोन प्रेरणादायी शब्दांसाठी.


या "दररोज थोडसे" मंत्रा मध्ये अनेक गोष्टी दडलेल्या आहेत हे मला त्यावर काम करताना जाणवले.


यामध्ये चुका करण स्वस्त पडतं कारण, स्पर्धा ही स्वतःची स्वताशीच असते. बर यात तुमची एखादी गोष्ट फसली तर ती कल्पना फसलेली असते, तुम्ही आम्ही नाही. आपली खिलाडूवृत्तीही वाढते … कारण , तुम्ही आम्ही कितीही चांगले असलो, तरी कधी कधी नावासमोर भोपळा हा लागतोच.


प्रसिद्ध गोल्फ खेळाडू टायगर वूड्सला एकदा एकाने विचारले की, "तू जसा शॉट मारतोस ना, मला तसा शॉट मारायचा असेल तर काय करावे लागेल?" त्यावर टायगर वूड्सला त्याला म्हणाला की, "काही विशेष नाही, मी जसा शॉट मारतो ना तसा ‘दिवसातले १८ तास’ तसा शॉट मारण्याचा सराव करायचा बस्स, असे फक्त पुढील दहा वर्षे इतकंच.


नारायण मूर्ती एकदा असे म्हणाले होते "एका रात्रीत किमया करण्यासाठी मला २५ वर्ष लागली."


मित्रांनो आणि मैत्रिंनीनो, कधी कधी आपल्याला असे वाटते की "हे मला ३ - ४ वर्षापूर्वी कळले असते तर, हे त्यावेळी सुरु केले असते तर. पण मित्रांनो आणि मैत्रिंनीनो, आयुष्य हे असंच असत, तुम्हाला मला संधी मिळते तेव्हाच तुम्ही आम्ही सुरवात करतो."


"दररोज थोडसे" हा मंत्र आपण वापरला तर आपण स्वतःहून आपल्या आयुष्यात संधी निर्माण करतो. तो एक सुविचार आहे ना “Luck is the Meeting of Opportunity and Preparation”


सर्वात शेवटी सांगायचे म्हणजे या मंत्राला आणखी एका मंत्रांची जोड द्यावी लागते तेव्हा तो फळतो.


तो मंत्र म्हणजे - "सुरु कर, बस्स!"


- उल्हास कोटकर 9821033736






( 'Don't Push, Just Pull' ) आपल्या प्रगतीचा, समृद्धीचा व आनंदाचा मार्ग उघडण्यासाठी.

एकदा एक व्यक्ती डॉक्टरकडे गेली व म्हणाली, " डॉक्टर माझा एक अजबच प्रॉब्लेम होतो आहे. रोज रात्री झोपण्याच्या वेळी झोप येते मला, पण काही वेळा नंतर मी झोपेतच उठून चालू लागतो व शोधत शोधत एका दरवाज्या जवळ येतो. मी तो दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न करतो पण तो दरवाजा उघडतच नाही. त्यानंतर मला खूप घामाघूम व त्रास व्हायला लागतो. त्यानंतर का कोण जाणे झोपच लागत नाही. सध्या रोजच हे घडत आहे. कृपया मला मदत करा, मला काहीच सुचत नाही आहे, की मी काय करू?"


डॉक्टर शांतपणे त्या व्यक्तीचे ते सर्व बोलणे ऐकून घेतात व त्याला एक औषध देत दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्यास सांगतात. 


दुसऱ्या दिवशी पुन्हा ती व्यक्ती येउन पुन्हा तोच त्रास काल रात्री झाला ते सांगतात. थोडक्यात औषधाची मात्रा काही सफल होत नाही. ती व्यक्ती डॉक्टरांना सांगते की "अहो तो दरवाजा ढकलण्याचा मी खूप प्रयत्न करतो आहे, पण तो दरवाजाच उघडतच नाही."


डॉक्टर पुन्हा शांतपणे ऐकून घेतात व काही प्रश्न विचारतात. " मला सांगा तुम्ही तो दरवाजा ढकलण्याचा का प्रयत्न करत आहात?"


ती व्यक्ती म्हणते "डॉक्टर त्या दरवाज्याच्या मागे माझ्या प्रगतीचा, माझ्या समृद्धीचा व माझ्या आनंदाचा मार्ग आहे. मी खूप ढकलून तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो दरवाजा उघडतच नाही. त्यामुळे मला माझा प्रगतीचा मार्ग पाहता येत नाही आहे. त्यानंतर मला खूप घामाघूम व त्रास व्हायला लागतो. त्यानंतर का कोण जाणे झोपच लागत नाही. 


डॉक्टर हे सर्व ऐकून मनातल्या मनात हसतात व त्या व्यक्तीला पुन्हा एक प्रश्न विचारतात, " मला सांगा तुम्ही आतपर्यंत अनेक वेळा झोपेत चालत त्या दरवाजा पर्यंत गेला आहात?' त्यामुळे तो दरवाजा तुम्हाला सतत आठवत असेल?"


ती व्यक्ती "हो" 


डॉक्टर "मला आठवून सांगू शकाल की तो दरवाजा कसा दिसतो आहे? त्यावर रंग कसा आहे? त्यावर काय लिहिले आहे? डोळे बंद करून नीट पहा, मेंदूला ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करा? काय काय आठवते आहे ते मला सांगा"


ती व्यक्ती डोळे बंद करून डॉक्टर ने सांगितल्या प्रमाणे सर्व आठवू लागते. तो दरवाजा डोळ्यासमोर आणून नीट पाहू लागते. आणि थोड्या वेळाने ती व्यक्ती मोठ्याने ओरडतच उसळते. "डॉक्टर डॉक्टर मला समजले, मला ते दिसले, मला उत्तर मिळाले." 


डॉक्टर विचारतात " काय समजले, काय दिसले ते मला सांगा. तुम्हाला काय उत्तर कळले ते ही सांगा."


ती व्यक्ती " डॉक्टर मी खूप जोर देऊन तो दरवाजा डोळ्यासमोर आणला. अंधुक अंधुक दिसत होते प्रथम, पण मी जोर लाऊन पहिले तर मला त्या दरवाजावर एक पाटी दिसली, त्यावर काहीतरी लिहिले होते. त्यावर धूळ होती ती मी साफ केली, आणि पहिले की त्यावर लिहिले आहे 'दरवाजा उघडण्यासाठी तुमच्याकडे तो ओढून घ्या - ( Don't Push, Just Pull )


"डॉक्टर मी इतके दिवस तो दरवाजा निट पहिलाच नव्हता. त्यावरील पाटी व त्यावर काय लिहिले आहे याकडे लक्षच दिले नव्हते. मी रोज तो दरवाजा ढकलून उघडण्याचा प्रयत्न करत होतो. आज मला उत्तर मिळाले की तो दरवाजा उघडण्यासाठी माझ्याकडे तो ओढून घेतला तर तो उघडेल"


"डॉक्टर तुमचा मी खूप आभारी आहे. माझी ही समस्या सोडविण्यास तुम्ही मला मदत केली. मला माझ्या प्रगतीचा, समृद्धीचा व आनंदाचा मार्ग जो त्या दरवाजा मागे होता, तो दरवाजा उघडायचा कसा हे तुम्ही शोधण्यास मदत केल्याबद्दल. आज रात्री पुन्हा तो प्रसंग घडेल तेव्हा मी तो दरवाजा न ढकलता स्वतःकडे ओढून घेऊन उघडेन." 


मित्रांनो या गोष्टीतून एकच सुचवायचे आहे तुम्हाला, जे मला स्वतःला उमजले आहे. 'प्रश्न, प्रॉब्लेमस व आपल्या समोरील आव्हाने टाळून, दूर लोटून व ढकलून आपण कुठेच पोहचणार नाही. उलट त्या सर्व गोष्टी स्वतःजवळ ओढून घेऊनच आपण आपल्या प्रगतीचा, समृद्धीचा व आनंदाचा मार्ग उघडू शकतो. So Don't Push, Just Pull


- उल्हास कोटकर 9821033736




सायकल ते मर्सिडीज प्रेरणादायी प्रवास. ( वक्ते : विश्वास नांगरे पाटील, मृणाल कुलकर्णी, संजय पाखले ) / Program by Ulhas Kotkar

 







'उद्योजक - संजयजी पाखले' यांच्या 'सायकल ते मर्सिडीज' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी त्यांची मुलाखत 'समीरा गुजर' यांनी घेतली होती. याच कार्यक्रमातील 'विश्वास नांगरे पाटील' याचे भाषण खालील लिंकवर क्लिक करून ऐका व पहा. https://youtu.be/tugXQbwE71E याच कार्यक्रमातील अभिनेत्री 'मृणाल कुलकर्णी' याचे भाषण खालील लिंकवर क्लिक करून ऐका व पहा. https://youtu.be/x_qvDABJ8H0 उद्योजक - संजयजी पाखले यांच्यावरील डॉक्युमेंट्री खालील लिंकवर क्लिक करून पहा. https://www.youtube.com/watch?v=gdJYg... उद्योजक - संजयजी पाखले यांचे 'सायकल ते मर्सिडीज प्रेरक जीवनप्रवास व ८ यशोमंत्र.' याविषयावरील भाषण खालील लिंकवर क्लिक करून पहा. https://www.youtube.com/watch?v=yklmr...